१ जून १९८७ रोजी “ ज्ञान हेच सामर्थ्य “ हे ब्रीदवाक्य घेवून ‘झुंद ‘ या छोटेखानी बंगल्यात अवघ्या ५० विद्द्यार्थ्यांनासह श्री.चंद्रकांत रेणावीकर व रेणावीकर बंधुंनी अहिल्यानगर शहराच्या सावेडी उपनगरात वैदुवाडी परिसरात बालवाडी , १ली, २री चे वर्ग सुरू करून कै.दा.शं. रेणावीकर विद्द्यामंदिरचीमुहूर्तमेढ रोवली.
सन १९८७ ते १९९० या ३ वर्षात शाळा झपाट्याने वाढली आणि इ.८वी ते १०वी माध्यमिक विभाग असा रेणावीकर शिक्षण संस्थेचा विकास झाला.
सन २००४ मध्ये संस्थेच्या इतिहासात सर्वात मोठा बदल झाला.रेणावीकर शिक्षण संस्था अहिल्यानगर ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्याकडे ह्स्तांतरीत झाली.
विद्द्यालयाचे नामकरण आता म.ए.सो रेणावीकर माध्यमिक विद्द्यालय असे झाले. म.ए.सो.चे सर्व पदाधिकारी आपल्या शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री. विजय भालेराव सर, महामात्र मा. श्री. डॉ. अतुल कुलकर्णी सर हे शाळेच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील असतात. यांच्या बहुमोल अशा मार्गदर्शनाने शाळेच्या विकासाची वाटचाल सुरु आहे.
जून २०१६ मध्ये रेणावीकर माध्यमिक विद्यालयाच्या दुस-या मजल्यावरील विस्तारित बांधकामास सुरुवात झाली आणि अवघ्या १० महिन्यात हे कार्य पूर्णत्वास गेले आणि ३१ मार्च २०१७ रोजी विद्यालयाच्या इमारतीचा अर्पण सोहळा आणि सभागृहास ज्येष्ठ संघ कार्यकर्ते मा. श्री. दामोदर माधव तथा दामुअण्णा दाते सभागृह असे नामकरण देणे असा भव्य कार्यक्रम झाला.
सन २०१९ मध्ये विद्यालयाला केंद्र सरकारची भव्य अशी Atal Tinkering Lab मिळाली. ज्याद्वारे विद्यार्थ्यांना भिन्न-भिन्न वैज्ञानिक प्रयोग करण्याची संधी मिळाली.
म.ए.सो. पुणे यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली शाळा आज प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
शाळेची वैशिष्ट्ये
- माध्यमिक शालांत परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ९०% व ९०% पेक्षा जास्त गुण .
- अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक शिक्षक .
- जास्तीत जास्त बाह्य व स्पर्धा परीक्षा नियोजन व शंभर टक्के निकालाची परंपरा .
- सुसज्ज संगणक लॅब – अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक .
- E-Learning सुविधा उपलब्ध .
- सर्व साहित्यांसह सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा .
- नगर शहरात फक्त आपल्या विद्यालयात विद्यार्थी व पालकांसाठी ‘व्यक्तीमत्त्व विकास केंद्र ‘.
- सर्व सोयींनी युक्त भव्य व हवेशीर शाळेची प्रशस्त इमारत .
- अनेक मैदानी खेळाचा वर्षभर सराव होत असलेले शालेय भव्य क्रीडांगण .
- पिण्यासाठी AQUAGUARDच्या पाण्याची सोय .
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व शिस्तीसाठी cccसी.सी.टी.व्ही. सुरक्षा .
- शाळेची व विद्यार्थी सुरक्षा म्हणून गेटवर सतत सिक्युरिटी गार्ड हजर .
- आपत्कालीन काळात सुसज्ज व्यवस्थापण यंत्रणा – अग्निशमन यंत्रणा विद्यालयात उपलब्ध .
- सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज व आधुनिक सुविधांनी युक्त नवीन सभागृह .
- विविध समाजाभिमुख उपक्रम राबवणारी शाळा .
- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना देणारी शाळा .
- विविध क्षेत्राभेटी दरम्यान भौगोलिक, स्थानिक, नैसर्गिक तसेच सामाजिक बाबींचा विचार केला जातो .
- सुसज्ज वर्गखोल्या, फर्निचर .
- वर्षभर क्रीदावर्धिनीद्वारे विविध खेळाडू तयार केले जातात .
- वार्षिक सादरीकरण (PowerPoint presentation) मध्ये ‘ए’ श्रेणी .
- वार्षिक तपासणीत शाळेस उच्च श्रेणी प्राप्त .
- ज्ञानसंपन्न, सर्वांगीण विकासातून आत्मविश्वासू विद्यार्थी घडवणारी म.ए.सो.ची रेणावीकर माद्यामिक शाळा होय .
- या शैक्षणिक वर्षांपासून भारत सरकारच्या अटल टिंकरिंग लँबसाठी शाळेला मान्यता मिळाली आहे .