ग्रंथालय

ग्रंथालय – शाळेला एक सुसज्ज असे ग्रंथालय आहे. विद्यार्थ्यांसाठी गोष्टींची, चित्रकलेची, निबंध, थोर नेत्यांची ओळख, प्राण्यांची माहिती, असे पुस्तके आहेत.
शिक्षकांसाठी आत्मचरित्र, कादंब-या, कविता संग्रह, संदर्भग्रंथ, विनोदी साहित्य, रहस्य कथा यासारखे भरपूर साहित्य आहे.

सर्वच विद्यार्थी वेळेअभावी ग्रंथालयात जाऊ शकत नाही म्हणून वर्गवार वाचनपेटी देण्यात आली आहे.

ग्रंथालयाचे वैशिष्ट्य

  • वयोगटानुसार पुस्तकांची विभागणी.
  • वेगवेगळ्या पद्धतीने पुस्तकांची रचना.
  • विविध लेखकांचे फोटो त्यांची वाक्ये.
  • पुस्तकावर क्रमांक असल्याने सापडण्यास मदत.

ग्रंथालय माहिती (प्राथमिक विभाग)

  • शिक्षक ग्रंथालयातील पुस्तके – ७७९
  • विद्यार्थी ग्रंथालयातील पुस्तके – ४१०१
  • वाढदिवसाची आलेली एकूण पुस्तके – ५६
  • देणगी स्वरुपात आलेली पुस्तके – १७

प्राथमिक विभागात ग्रंथालयाचा वापर:
इयत्ता दुसरी ते इयत्ता सातवी पर्यंत प्रत्येक  वर्गाला स्वतंत्र वाचन पेटी आहे प्रत्येक वाचन पेटीत कमीत कमी त्यांच्या इयत्तेच्या पटा इतके किंवा त्यापेक्षा जास्त पुसतके असतात.

इयत्ता ७ वी अ च्या विद्यार्थ्यांना दर गुरुवारी ग्रंथालयातून पुस्तके दिली जातात. विद्यार्थ्यांनी जि पुस्तके वाचली आहेत त्याची नोंद करावयास सांगितली आहे.
इयत्ता ७ वी अ च्या विद्यार्थ्यांना खालील विषयावर “पेपर कात्रण प्रकल्प”तयार करावयास सांगितला आहे.

कात्रण प्रकल्पाचे विषय खालील प्रमाणे
औषधी वनस्पती, फोटोग्राफी, आहार, पाणी वाचवा पाणी जिरवा, नदी, शास्रज्ञाची माहिती, योगासने, पक्षी जगत, ऐतिहासिक वास्तू, राजकारण, योगासाने, सफर नद्यांची, प्राणी जगत, अवकाशयान, तारांगण, आपत्ती व्यवस्थापन, सण उत्सव, खेळ विश्व इत्यादी.

ग्रंथपालाची माहिती

नाव: सौ.ज्योती अविनाश कुलकर्णी