शिक्षक पालक संघ

शिक्षक पालक संघ सद्य परिस्थिती

रेणावीकर विद्या मंदिर प्रशालेत सन १९८९-९० पासून दरवर्षी शिक्षक पालक संघ स्थापन करण्यात येतो.
नूतन कार्यकरणीची निवड १ ली ते इयत्ता ७ वी च्या पालकांमधून करण्यात येते. मुख्याध्यापक अध्यक्ष असतात. सचिव जेष्ठ अध्यापक असून इयत्ता नुसार दोन-दोन सदस्य निवडण्यात येतात.

प्रत्येक शैक्षणिक वर्षात निदान चार वेळा तरी सभा घेण्यात येतात. सभेत महत्वाचे विषय मांडण्यात येतात.तसेच मंजुरी घेण्यात येते.
प्रशालेच्या विविध कार्यक्रमात शिक्षक पालक संघाचे योगदान असते जसे स्नेहसंमेलन, हळदी कुंकू समारंभ, तिळगुळ समारंभ.

शिक्षक पालक यांचे सबंध स्नेहपूर्ण असल्याने शाळेची प्रगती उत्तरोत्तर वाढतच आहे.