मुख्याध्यापकाचे मनोगत

saysingh-vasave-principalनमस्कार,

प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांची सतत रेलचेल असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन व अध्यापनाबरोबरच गुरुपौर्णिमा, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, म. गांधी जयंती तसेच शिक्षक दिन, हिंदी दिन, मराठी दिन, संस्कृत दिन, विज्ञान दिन इत्यादी महत्वपूर्ण दिवस उत्साहाने साजरे केले जातात. तसेच विविध स्पर्धा, प्रदर्शने तसेच क्षेत्रभेटी, क्रीडा महोत्सव, स्नेहसंमेलन यांसारखे विविध पूरक उपक्रम घेतले जातात. प्रशालेने वर्षभर स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला होता आणि विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीच्या माध्यमातून ऐतिहासिक ठिकाणी स्वच्छता केली. तसेच रक्षाबंधन व दिवाळीच्या सणापूर्वी स्वदेशी मालाची खरेदी व परदेशी मालावर बहिष्कार याबाबत जनजागृती करण्यासाठी राखी व माहितीपत्रक विद्यार्थ्यांनी समाजात घरोघरी जाऊन वाटप केले.

ग्रंथप्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, फूड फेस्टीवल इत्यादी प्रदर्शनातूनही विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्याचा प्रयत्न केला. तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि समाजातील दुर्मिळ घटकांच्या कल्याणाची ओढ यातून प्रशालेचे विद्यार्थी दरवर्षी नगर ग्रामीण बालसुधार सेवा मंडळ, भैरवनाथ विद्यालय व स्नेहालयाला तेथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व दैनंदिन वापरातील वस्तू भेट देतात. अशा विविध प्रकारच्या प्रकारच्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची मुल्ये रुजवली जातात.

मुख्याध्यापकांतील विलक्षण सामंजस्य, उत्साही व अनुभवी शिक्षकवर्ग, लिपिक, ग्रंथपाल व संगणक शिक्षक आणि सेवक वर्ग हि शाळेच्या यशाची पंचसूत्रे आहेत, तसेच शिक्षक-पालक संघ या सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या प्रगतीत सुधारणा होत आहे. हि सर्व जबाबदारी पार पाडताना संस्था आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. आमच्या शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री. विजय भालेराव सर व महामात्र मा. श्री. डॉ. अतुल कुलकर्णी सर हे शाळेच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील असतात. यांच्या बहुमोल अशा मार्गदर्शनाने शाळेच्या विकासाची वाटचाल सुरु आहे, म्हणून त्यांचे आभार.

श्री. सायसिंग वसावे
म.ए.सो. रेणावीकर माध्यमिक विद्यालय (मुख्याध्यापक)