मुख्याध्यापकाचे मनोगत

manjusha-kulkarniम.ए.सो.पूर्व प्राथमिक शाळा शैक्षणिक सन २०१९-२० मध्ये ११६ विद्यार्थी बालवाडीत शिक्षण घेत आहे. आमच्या शाळेतील तीन ते पाच या वयोगटातील मुले वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी उत्सुक असतात. निरीक्षण शक्ती जास्त असते. समजून घेण्याची म्हणजेच आकलन शक्तीत वाढ झालेली असते. नाक  डोळे  हात या माध्यमातून मुले अनेक गोष्टी शाळेत बघतात. स्पर्शाने अनुभव घेतात. त्यांना अनुभव समृद्ध करण्यासाठी मुद्दाम काही गोष्टी शाळेत केल्या आहे. हेच बघा ना शाळेतील वातावरण प्रसन्न असावे म्हणून शाळेच्या बोलक्या भिंती तयार केल्या आहेत. त्या भिंतींवर मुलांच्य आवडत्या विषयातील चित्र म्हणजे ससा  कासव  हत्ती  छोटा भीम आणि इतर कितीतरी पशु-पक्ष्यांची चित्रे भिंतीवर काढलेली असल्याने मुले रोज एकदा तरी त्यावर हात फिरवतातच  छोट्या गटातील मुले हात फिरवत फिरवत वर्गात जातात. तर मोठ्या वर्गातील मुले वर्गात जाताना पशु-पक्ष्यांची नक्कल करतात.

या वर्षीपासून आम्ही खेळवाडीचा वर्ग सुरु केला आहे. हसत खेळत अभ्यासक्रमाबरोबर  शाळेत विविध स्पर्धा  उपक्रम  प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या संकृतीची ओळख व त्यातून केले जाणारे संस्कार  तसेच इंग्रजीची गोडी लागावी म्हणून इंग्रजी संभाषण कौशल्य वर्ग व सेमी इंग्रजी घेतात. अहिल्यानगर शहरात एकमेव प्रशालेत समुपदेशन केंद्र असणारी शाळा होय. निरीक्षणशक्ती  एकाग्रता वाढीस लागणारे शैक्षणिक खेळ व मैदानी खेळ  साहित्य या सर्व गोष्टींमध्ये विद्यार्थी आनंदाने सहभागी होतात. विद्यार्थ्यांबरोबर आम्ही पालकांसाठी विविध कार्यशाळा  विविध स्पर्धा दरवर्षी घेत असतो. त्यात सर्व पालक सहभाग घेतात. या वर्षी आम्ही फॅन्सी ड्रेस  रांगोळी  पाककला स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

सौ. कुलकर्णी मंजुषा विजय
विभाग प्रमुख