कै. दा.शं. रेणावीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अहिल्यानगर शहरस्तर चित्रकला स्पर्धांचे आयोजन –
सन १९९१ ते २००४ पर्यंत सलग स्पर्धांचे आयोजन.
आंतर शालेय लेझीम स्पर्धांचे आयोजन –
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे रेणावीकर विद्यालय अहिल्यानगर व क्रीडाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने कै. कमल देशमुख स्मृतीप्रीत्यर्थ लेझीम स्पर्धेचे आयोजन.
जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन –
जिल्हास्तरावर मेजर दिनुभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळ, क्रीडाभारती, योगविद्याधाम व म.ए.सो. रेणावीकर प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन.
सन २०१४-१५ मध्ये जिल्हा परिषद व म.ए.सो. रेणावीकर प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ प्रदर्शनात विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन –
स्वरचित काव्यवाचन स्पर्धा
निबंध स्पर्धा
वक्तृत्व स्पर्धा
जिल्हा परिषद व म.ए.सो. रेणावीकर प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने शहर स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे डिसेंबर -२००९ व २००५ मध्ये आयोजन करण्यात आले.
म.ए.सो. आंतरशालेय क्रीडा करंडक स्पर्धेचे अहिल्यानगर येथे सन २०१२-१३ ला आयोजन करण्यात आले.
रौप्य मोह्त्सवी वर्ष निमित्त पालकांसाठी निबंध व पाककला स्पर्धेचे आयोजन केले यामध्ये पालकांचा उत्स्फुर्त सहभाग होता.