





Slide Two
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी
रेणावीकर प्रशाला, सावेडी, अहिल्यानगर
सावेडी, अहिल्यानगर , पुणे, महाराष्ट्र, भारत

Slide Two - copy
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी
कै.दा.शं.रेणावीकर विद्या मंदिर (प्राथमिक)
सावेडी, अहिल्यानगर , पुणे, महाराष्ट्र, भारत

WhatsApp Image 2024-11-18 at 14.35.11

20

b2

b3

मएसो. रेणावीकर शालेय इतिहास
१ जून १९८७ रोजी "ज्ञान हेच सामर्थ्य" हे ब्रीदवाक्य घेवून 'झुंद' या छोटेखानी बंगल्यात अवघ्या ५० विद्द्यार्थ्यांनासह श्री.चंद्रकांत रेणावीकर व रेणावीकर बंधुंनी अहिल्यानगर शहराच्या सावेडी उपनगरात वैदुवाडी परिसरात बालवाडी, १ली, २री चे वर्ग सुरू करून कै.दा.शं. रेणावीकर विद्द्यामंदिरची मुहूर्तमेढ रोवली. सन १९८७ ते १९९० या ३ वर्षात शाळा झपाट्याने वाढली आणि बालवाडी, इ.१ली ते ७ वी प्राथमिक विभाग आणि इ.८वी ते १०वी माध्यमिक विभाग असा रेणावीकर शिक्षण संस्थेचा विकास झाला. सन १९९० मधे संस्था स्वत:च्या हक्काच्या जागेत स्थलांतरीत झाली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बद्दल
शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमा पासून विविध कलांच्या प्रशिक्षणापर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्रविस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७४ शाखांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.